मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (09:06 IST)

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे.  नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी फॉलोवर्सचा आकडा पार केला आहे. बच्चन यांच्या फेसबुकवर ३ कोटींहून अधिक फॉलोवर्स असल्याची माहिती बिग बींनी स्वतः फेसबुकवर दिलीये. अमिताभ यांनी काही मजेशीर फोटोंसह २००७ मध्ये त्यांनी जी पोस्ट केली होती ती शेअर करत म्हटले की, ‘फेसबुकवर ३ कोटी फॉलोवर्स, तुम्ही सगळ्यांनी मला जे प्रेम दिलं आहे त्यासाठी मनःपूर्वक आभार.’ ट्विटरवर अमिताभ यांचे ३.४ कोटींहून जास्त फॉलोवर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ८० लाखांहून जास्त फॉलोवर्स आहेत.