सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (09:11 IST)

ट्रोलिंग प्रकाराबाबत अमिताभ बच्चन नाराज

‘ट्रोलर्संना उत्तर देण्यात मला वेळ घालवायचा नाही, त्यापेक्षा तो वेळ मी माझ्या कामाला किंवा चाहत्यांना देणे पसंत करेन’, असे महानायक अमिताभ बच्चन त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ते सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऑक्टिव आहेत. आपल्या ब्लॉग, ट्विटरच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांशी संपर्कात असतात. मात्र युजर्सकडून होणाऱ्या ट्रोलिंगच्या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ब्लॉगमध्ये ते म्हणाले, ‘मी ट्रोलर्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. ट्रोलिंगमुळेच मला चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. शिव्या द्यायला माझ्याकडे वेळ नाही.  कुणी मला शिव्या देऊ इच्छित असेल तर मी स्वागतच करतो. माझा वेळ माझ्या चाहत्यांसाठी आणि ब्लॉग लिहिण्यासाठीच आहे असे म्हटले आहे.