मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (16:54 IST)

दीपिकाच्या पाठीवरील टॅटू गायब ?

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये दीपिका अनेक वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसली. कधी पर्पल पेंटसूट तर कधी पर्पल जीन्स आणि व्हाईट टीशर्ट. कान्समधील तिचा प्रत्येक अंदाज काही खास आणि निराळा होता. शुक्रवारी दीपिकाने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी पिंक परी बनून ती रेड कार्पेटवर अवतरली. मात्र दीपिकाच्यापाठीवरील टॅटू गायब झालेला दिसला. 

दीपिका आणि रणबीर कपूर खूप काळ रिलेशनशीपमध्ये होते आणि त्याचदरम्यान दीपिकाने आपल्या पाठीवर आरके असा रणबीर कपूरच्या इनिशियल्सचा टॅटू गोंदवला. मात्र कालांतराने दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला. तरी देखील तिच्या पाठीवरील टॅटू कायम होता. याआधी  एक साबण्याच्या जाहिरातीतही साडी नेसलेल्या दीपिकाच्या पाठीवर टॅटू मात्र दिसत नाही. मेकअपने टॅटू लपवण्यात आल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षी कान्समध्ये टॅटूसहीत रेड कार्पेटवर अवतरली होती.