शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (09:02 IST)

ऐशची झाली इन्स्टाग्रामवर एंट्री

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने  कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला जाण्याअगोदरच इन्स्टाग्रामवर एंट्री केली आहे.  ऐशने जेव्हा इन्स्टावर एंट्री केली तेव्हा काही मिनिटांतच फॉलोअर्सचा आकडा हजाराच्या घरात पोहोचला. सेलिब्रिटींमध्ये तिला सर्वात अगोदर निर्माते निखिल त्रिवेदी यांनी फॉलो केले. दरम्यान, ऐश्वर्याने तिच्या अकाउंटवरून एकही फोटो शेअर केला नाही.    
 
बॉलिवूडमधील बरेचसे कलाकार अजूनही सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यामध्ये करिना कपूर-खान, सैफ अली खान, आदित्य रॉय आणि राणी मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे.

ऐश्वर्यानेदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर येण्याचा निर्णय करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या सांगण्यावरून घेतला.