शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (15:30 IST)

सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस तळपदे झाला बाबा

मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेल्या श्रेयस तळपदेच्या घरी सरोगसीच्या माध्यमातून ४ मे ला मुलीचा जन्म झाला आहे.  श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती यांना लग्नाच्या १४ वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली आहे. मी स्वतःला पिता म्हणून सिद्ध करू शकेन की नाही, याबाबत माझ्या मनात संभ्रम होता.  आता बाळाच्या जन्मानंतर मला खूप आनंद झाला आहे. मी आणि दीप्ती आता तिचं नाव काय ठेवायचं हा विचार करत आहोत. माझ्या वेळापत्रकातला जास्तीत जास्त वेळ मी माझ्या बाळासाठी द्यायचा प्रयत्न करत आहे, असं मनोगत श्रेयसने व्यक्त केलं आहे.
 

मला जेव्हा समजलं की मी बाबा होणार आहे, तेव्हा मला मुलगीच व्हावी असं फार मनापासून वाटत होतं. जेणेकरून मी तिच्यासाठी बाहुल्या, टेडी बेअर्स आणि छान छान कपडे आणू शकेन. त्यामुळे मी परत कामात व्यग्र होण्यापूर्वी तिच्यासाठी काय काय आणायचं हाच विचार करत आहे, असंही श्रेयस पुढे सांगितले आहे.