1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मे 2018 (17:31 IST)

'माऊली' मध्ये रितेशच्या सोबत संयमी खेर

ritesh deshmukh
रितेश आता 'माऊली' या चित्रपटातून पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे रितेशसोबत 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत रितेशने काहीच दिवसांपूर्वी 'माऊली' सिनेमाची घोषणा केली होती. आदित्य सरपोतदार सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेत आहेत. 2019 मध्ये 'माऊली' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
संयमी ही प्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. 'लय भारी'मध्ये रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी आझमी यांची ती भाचीआहे.