सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अमेय खोपकरचा भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर यांनी मराठी सेलिब्रिटींचा एका भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘मराठी सेलिब्रिटी अॅकापेला’ असं या व्हिडिओचं शीर्षक आहे. अॅकापेला प्रकारातील या व्हिडिओत ६६ कलाकार आणि ४३ गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वाद्यांचा आवाज तोंडाने काढून गाणं गाण्याची ही कला म्हणजे ‘अॅकापेला’. एव्हीके एंटरटेन्मेंट निर्मित या अनोख्या कलेच्या व्हिडिओत मराठीतील नवोदित कलाकारांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांना पाहायला मिळत आहेत. अभिजीत पानसे, अभिनय देव, भरत जाधव, किशोरी शहाणे, महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मानसी नाईक, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, संजय जाधव, सोनील खरे, स्वप्नील जोशी, विनोद कांबळी, विक्रम फडणीस ही अनोखी कला सादर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.