शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

जन्मदिनी दादासाहेब फाळकेचे खास डुडल

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या आज जन्मदिनी गुगलकडून खास डुडल साकारल आहे. दादासाहेबांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून भारतात खऱ्या अर्थानं चित्रपट उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली.
 
फाळके यांचा जन्म  1870 साली झाला आणि 1944 साली त्यांचं निधन झाले. मूळ त्र्यंबकेश्वरचे असणारे फाळके यांनी १९१३ मध्ये पहिला भारतीय सिनेमा तयार केला.  चित्रपटनिर्मितीच्या अवघ्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 सिनेमे आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेब फाळके यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.