बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 एप्रिल 2018 (13:59 IST)

रीना चा "कॅरी ऑन" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल

निसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. सध्याच्या युगात आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टी या एकत्र आणत आहोत ; त्या बदल्यात मानवालाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करून मानवाने नवनवीन प्रयोग केले पण त्या पर्यावरणाला हानी पोहचवण्याचे काम करत असल्याने त्याचा परिणाम शेवटी सजीवांवरच झाला. प्लास्टिक हा मानवनिर्मित घटक सध्या एक गंभीर विषय बनत आहे. प्लास्टिकच्या हा अतिवापरामुळे वायू आणि जलप्रदूषण होत असल्याची आपणास चित्र दिसताहेत. याच प्लास्टिक पिशव्यांच्या अतिवापरामुळे मुंबईत पावसाळी हंगामात "पूर" आला कारण प्लास्टिक पिशव्या गटारात अडकल्या कारणामुळे पाण्याचा योग्य तो निचरा होऊ शकला नाही.

प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी यावी म्हणून खूप लोक पुढे सरसावत आहे. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी किती घातक आहे आणि आपण प्लास्टिक पिशवीच्या वापर टाळावा याचे प्रबोधन करताना दिसत आहे, पण याच गंभीर प्रश्नाला एक “स्मार्ट” पद्धतीने हाताळत एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. अभिनेत्री रीना अगरवाल आणि दिग्दर्शक सुमित पाटील यांनी "कॅरी ऑन " या टॅग अंतर्गत जागतिक पृथ्वी दिनी एक व्हिडीओ वायरल केला,  ज्यामध्ये आपल्या रोजच्या वापराच्या गोष्टी आपण "स्मार्ट" पद्धतीने एका कॅरी बॅग च्या रूपात वापरू शकतो हे सांगितले आहे.
टेलिव्हिजन मधून आपल्या करियरची सुरुवात करणारी रीना हिला नेहमीच दमदार अश्या भूमिका मिळत आल्या मग तो क्या मस्त है लाईफ मधील टीया असो, वा एजन्ट राघव मधील डॉक्टर आरतीची भूमिका असो ; प्रत्येक पैलू मध्ये रीना अतिशय वेगळीच दिसत आली आहे. रीना ने बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपट केलेले आहे, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान"च्या  तलाश  पासून मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच " सोनाली कुलकर्णी "च्या अजिंठा ह्या चित्रपटांमध्ये रिना ला अभिनयाची संधी मिळाली, यासोबतच बेहेन होगी तेरी या चित्रपटात देखील अभीनेता राजकुमार राव आणि श्रुती हासन सोबत रिनाची महत्वाची भूमिका होती. येणाऱ्या वर्षी अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्यासोबत एका आगामी चित्रपटात रीना प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . या चित्रपटात रीनाची नेमकी कशी भूमिका असेल यावर सर्वांचे लक्ष आहे.