सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (15:24 IST)

‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता चित्रपटात

सध्या बोलणारा कोंबडा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील ‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता एका चित्रपटात झळकणार आहे. सांगलीच्या आळसंद गावातील या कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकातील दिग्दर्शकाने ऑफर दिली आहे. त्याचप्रमाणे बीडमधील काही लोक या कोंबड्यावर लघूपटही बनवणार आहेत.
 
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर कोंबडा स्वत:ला विकण्यास नकार देत ‘अण्णा’म्हणून ओरडला असा एक व्हिडीओ व्हायरल झाल होता. या व्हिडीओतील कोंबड्याला कर्नाटकातील एका दिग्दर्शकाने चित्रपट घेण्याचं ठरवलं आहे. तर, काही लोक त्यावर लघूपटही बनवणार आहेत. यासाठी सगळ्यांनी कोंबड्याच्या मालकाची देखील भेट घेतली आहे.