शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (10:06 IST)

साधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला

marathi movie
लेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचं आहे. या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन आणि वेशभूषा हे तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकने जाहीर झालेले आहेत. येत्या २२ जून रोजी ‘झिपऱ्या’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेली तीन मुलं दिसत आहेत.