मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मे 2018 (09:39 IST)

रितेश देशमुख 'माऊली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता रितेश देशमुख माऊली या सिनेमातून पुन्हा भेटीला येत आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर जेनेलिया देशमुख सिनेमाची निर्मिती करणार आहे. याबाबतची घोषणा रितेशची पत्नी जेनेलियाने केली आहे. तो येतोय असं म्हणत तिने सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली असल्याची माहिती दिली. हा सिनेमा कधी रिलीज होईल आणि यामध्ये आणखी कोण-कोण असेल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पोस्टर पाहून चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.