चाहत्यांची इच्छा केली पूर्ण
अभिनेत्री अदा शर्मा हिचे बॉलिवूडमधील करिअर अडखळत असले तरी, सोशल मीडियावर मात्र ती सुसाट असल्याचे दिसून येत आहे. कारण ती वेळोवेळी सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि फोटोज् अपलोड करून चाहत्यांना एकप्रकारची भेट देत असते. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या तुफान आहे. अदाने 11 मे रोजी म्हणजेच तिच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अदा ज्यापद्धतीने आपल्या अदा दाखवित आहे, त्यावरून चाहते तिच्यावर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव करीत आहेत. एक-एक रिदम पकडून अदा डान्स करताना दिसत आहे. अदाचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, त्यास मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे.
अदा शर्माने हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार... तुम्ही सर्व माझ्यासोबत असल्याने मी नशीबवान आहे. मला अदा फॅनक्लब्सकडून जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्याची विनंती केली जात असल्यानेच मी हा नवा व्हिडिओ अपलोड करीत आहे.' या व्हिडिओमध्ये अदा खरोखरच कमालीचाडान्स करताना बघावयास मिळत आहे. आता चाहत्यांना तिला काहीसा असाच डान्स करताना चित्रपटात बघावयाचे आहे.