शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (15:39 IST)

अभिनेता अर्जुन रामपाल घरात राहत नाही

अभिनेता अर्जुन रामपालने त्यांचे वांद्रे येथील घर सोडले असून तो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. कारण अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी सुझान आणि अर्जुनचे अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अर्जुन आणि मेहेरमध्ये भांडणं झाली होती.  मात्र नंतर त्या दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवत एकमेकांसोबत नव्याने सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा मेहेरच्या मनात संशय आला आहे.

अर्जुन आणि मेहेर यांचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले आहे. ते वांद्रे येथील एका उच्चभ्रू इमारतीत मुली माहिका व मायरा यांच्यासोबत राहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेथे राहत नसल्याचे समोर आले आहे. मेहेर हिच्या मनात पुन्हा अर्जुन आणि सुझानच्या नात्याविषयी संशयाची पाल चुकचुकली आहे. अर्जुनने अनेकदा समजावून देखील मेहेर त्याच्यावर संशय घेत असल्याने त्याने दोन आठवड्यांपूर्वी घर सोडल्याचे समजते.