1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

Raazi alia bhat
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला आणखी एक छान कारण तिने दिले आहे. आलियाने आपल्या वॉरड्रोबमधल्या काही फेव्हरेट कपड्यांचा लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारे सगळे पैसे एका स्वयंसेवी संस्थेला देणगी म्हणून दिले जाणार आहेत. ही संस्था प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग करून त्याच्या आधारे सौर ऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प चालवते. या सौर ऊर्जेचा वापर ज्या ग्रामीण भागात आप वीज पोहोचलेली नाही, तेथे केला जाणार आहे. आपल्या या निर्णयाविषयी बोलताना आलियाने सांगितले की तिला पर्यावरण संतुलनाच्या कामामध्ये विशेष रस आहे. पर्यावरणाची सर्वाधिक हानी प्लॅस्टिकमुळे होत असते. त्यामुळे प्लॅस्टिकचे पुन‍निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या संस्थेला मदत व्हावी, म्हणून आपल्या फेव्हरेट कपड्यांचा लिलाव करणार असल्याचे तिने सांगितले. तिने या लिलावाचे नाव माय वॉरड्रोब इज शू वॉरड्रोब' असे नाव दिले आहे.