सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (08:51 IST)

सोनम झाली ट्रोल

लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे.आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. 'सोनम कपूर' हे नाव बदलून तिने 'सोनम के अहुजा' असं ठेवलं. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी, अनेकांचं रोल मॉडेल असलेल्या सोनमला नावात बदल करण्याची इतकी घाई का झाली होती? असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

फक्त सोनमनेच नाही, तर तिचे पती आनंद अहुजांनीही आपल्या नावापुढे सोनमचं नाव लावलं. आनंदने आपल्या इन्स्टाग्रामवर 'आनंद एस अहुजा' नाव बदललं. एकीकडे आनंदनं पाडलेल्या नव्या पायंड्याचं कौतुक होतं आहे, तर सोनमला मात्र टार्गेट केलं जात आहे.