मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बाबांसोबत झळकणार श्वेता नंदा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर पर्दापण करणार आहे. विशेष म्हणजे ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. कल्याण ज्वेलर्सच्या  एका जाहिरातीत श्वेता, वडील अमिताभ यांच्यासोबत झळकणार आहे. दोघांनीही या जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले आहे. 

जाहिरातीत श्वेताचा लूक अतिशय साधा आहे. तर बीग बी ही सामान्य वेशात दिसत आहेत. ही जाहिरात जुलैमध्ये ऑन एअर येईल. या जाहिरातीची निर्मिती मल्याळममध्येही करण्यात आली असून त्यात श्वेताऐवजी मंजू वॉरिअर दिसेल.