गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मे 2018 (15:53 IST)

दुश्मनी असावी तर अशी

बॉलीवूडमध्ये एक म्हण आहे की दोन हिरॉईन्समध्ये कधीही मैत्री होऊ शकत नाही. तर तुम्हाला सांगत आहोत त्या हिरॉईन्सबद्दल ज्यांच्या शत्रुत्वाची चर्चा दूर दूरपर्यंत झाली आहे.
प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर
'ऐतराज' चित्रपटात करीना कपूर खान आणि प्रियंका चोप्राने सोबत काम केले होते. करीना हिरॉइन होती जेव्हा की प्रियंका खलनायिका. चित्रपटात सोबत काम करताना दोघींमध्ये कधीही मैत्री झाली नाही. दुश्मनी तर तेव्हा अधिक वाढली जेव्हा प्रियंकाच्या खात्यात करीनापेक्षा जास्त प्रशंसा आली. कपूर कन्येला ही बाब काही पटली नाही आणि तिनी प्रियंकाला फार नाव ठेवले. 14 वर्ष जुनी या दुश्मनीवर अद्यापही वेळेचा काहीही प्रभाव पडलेला दिसत नाही. 
कॅटरीना कैफ आणि दीपिका पादुकोण
रणबीर कपूरला घेऊन या दोघी समोरा समोर आल्या होत्या. दीपिकाशी ब्रेक-अप झाल्यानंतर रणबीरच्या लाईफमध्ये कॅटरीना कॅफची एंट्री झाली आणि ही बाब दीपिकाला बिलकुल आवडली नाही. तेव्हा पासून या दोघी एकमेकाला बिलकुल पसंत करत नाही. दोघींमध्ये व्यावसायिक प्रतिस्पर्धा देखील आहे.  
रेखा आणि जया बच्चन
रेखाला जया बच्चन कशी सहन करू शकते. अमिताभ आणि रेखाच्या रोमांसच्या चर्चेने जयाला बेचैन करून दिले होते. 'कुली'च्या सेटवर अपघात झाला आणि जयाने बरेच महिने अमिताभ यांची सेवा केली. यानंतर अमिताभ यांनी रेखाशी दुरावा निर्माण करून घेतला. जया आणि रेखा एक-मेकला पसंत करत नाही, पण आमने-सामने आल्यावर हाय-हॅलो जरूर करतात.  
राखी सावंत आणि सनी लियोनी
सनी लियोनी बॉलीवूडमध्ये काय आली, राखीची मागणी एकदम कमी झाली. यानंतर राखी तोप (तोंड)च्या माध्यमाने आग काढू लागली. पोर्न स्टार म्हटले. हे ही म्हटले की सनी ने माझा नंबर पोर्न इंडस्ट्रीत वाटला आहे. ती सतत सनीला नाव ठेवायचे काम करत होती. दुसरीकडे सनीने चुपचाप राहण्यातच भलाई समजली, आणि राखीशी दुरी बनवून घेतली.