गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By

श्रीदेवीचे काही वैशिष्ट्ये

पहिली फीमेल सुपस्टार म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी एक कोटी फीस आकारणी पहिली नायिका होती.
 
आपली पर्सनल वॅनिटी व्हॅन तयार करवणारी श्रीदेवी पहिली नायिका होती. त्या काळी एकच वॅनिटी मुंबईत प्रत्येक जागी शूटिंगसाठी जात असे.
 
यश चोप्रा हे श्रीदेवींना अ स्वीच ऑन अँड अ स्वीच ऑफ एक्ट्रेस म्हणायचे कारण सीन समजत असताना त्या अगदी शांत असायच्या आणि अॅक्शन बोलत्याक्षणी वेगळीच श्रीदेवी समोर‍ दिसायची.
 
श्रीदेवींना ऑन स्क्रीन रडण्यासाठी कधीच ग्लिसरीनची गरज भासली नाही. सीन समजल्यावर त्या स्वत: नॅचरली रडू लागायच्या.
 
वडील आणि मुलगा यांच्यासोबत काम करणारी श्रीदेवी ही सर्वांच्या पुढे होती. एएनआर- नागार्जुन, शिवाजी- गणेसन आणि प्रभू, धर्मेंद्र- सनी देओल, विनोद- अक्षय खन्ना.
 
अप्सरा लुक हा ट्रेड श्रीदेवीमुळे आला. नंतर जया प्रदा, मीनाक्षी शेषाद्रि, पद्मिनी कोल्हापुरे, विद्या बालन सारख्या नायिकेदेखील या लुकमध्ये दिसल्या.
 
बेटा, बाजीगर, युगपुरुष, मोहरा आणि डर सारखे चित्रपट श्रीदेवीने नाकारले होते.