शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By

श्रीदेवींनी केल्या होत्या २९ शस्त्रक्रिया

वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवींच्या सुंदरतेबद्दल बोलायला गेलो तर त्या खूपच सुंदर होत्या. आपल्या वयाहून कितीतरी लहान दिसणार्‍या श्रीदेवींच्या सुंदरतेचे रहस्य त्यांनी करवलेल्या कॉस्मेटिक सर्जरी होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लिप सर्जरी करवली होती.
 
श्रीदेवी आपल्या सुंदरतेबद्दल खूप सजग होत्या. चेहरा तरूण दिसावा यासाठी बोटाक्सचा वापर त्या करत होत्या. ब्युटीनेस मेंटेन ठेवण्यासाठी त्या सतत ट्रीटमेंट घेत असे. यासाठी त्या अनेकदा साऊथ कॅलिफॉर्निया जात असे. सुंदर दिसण्यासाठी त्यांनी सुमारे २९ शस्त्रक्रिया केल्या होत्या. यापैकी एक शस्त्रक्रिया योग्यप्रकारे झाली नव्हती. यामुळे त्या काही डायट पिल्स आणि अ‍ॅन्टी एजिंग औषधे घेत होत्या. श्रीदेवींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. डायट पिल्सचा विपरित परिणाम हृद्यावर होत असे.
 
श्रीदेवीने लेझर स्किन सर्जरी, सिलिकोन ब्रेस्ट करेक्शन, बोटोक्स अँड ऑक्सी पिल्स, फेस लिफ्ट अप्स, बॉडी टकिंग करवली होती. यासह फिट राहण्यासाठी तसेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही ट्रिटमेंट घेतली होती.