गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (10:51 IST)

अष्टपैलू अभिनेत्री गमावली - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

All-round actress lost - Chief Minister's tribute
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अष्टपैलू अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
 
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्या अर्धशतकी कारकीर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका तितक्याच समर्थपणे  साकारल्या होत्या. विशेषत: सदमा, चांदणी, लम्हें यासारख्या चित्रपटांपासून ते अलीकडच्या इंग्लिश विंग्लिशपर्यंतच्या  अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका निश्चितच दीर्घकाळ स्मरणात राहतील. अभिनय, सौंदर्य आणि कलानिपुणता  यांचा अनोखा संगम असलेल्या श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्याला खऱ्या अर्थाने  ग्लॅमर प्राप्त करून दिले होते.’