बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (12:09 IST)

प्रियांका करणार मराठी सिनेमा

प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव असलेला हा सिनेमा एका सत्यकथेवर अधारित असणार आहे. चांगली कथा आणि चांगली प्रतिभा प्रेक्षकांसोर आणण्यासाठीच आपण पर्पल पेबल पिक्चर्स ही प्रॉडक्शन कंपनी सुरु केल्याचे ती म्हणाली. 'पाणी' ही केवळ सत्यकथा आहे म्हणून नव्हे तर यातून एक सामाजिक मुद्दाही उपस्थित केला जाणार असल्याने याची निर्मिती आपण करणार असल्याचेही तिने सांगितले. प्रियांकाने सोशल मीडियावर एक ब्लू मोशल पोस्टर शेअर करून आपल्या चौथ्या मराठी सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. 'पाणी'चे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे करणार आहे. प्रियांकाने यापूर्वी 'व्हेंटिलेटर', 'काय रे रास्कला' आणि 'फायरब्रॅन्ड' या तीन मराठी सिनेमांचे प्रॉडक्शन केले आहे. प्रियांका गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्येच अ‍ॅक्टिव्ह होती. 'क्वांटिगो' ही तिची सिरीयल सुरूवातीला तर खूप चर्चेत होती. प्रियांका भारतात परत आली आहे आणि तिने आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या कामावर लक्ष केंद्रितकरायचे ठरवले आहे.