सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ

हॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर हॉलिवूडच्या अनेक नायिकांसह सुमारे 50 महिलांवर बलात्कार आणि दुर्व्यवहार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावरच हॉलिवूड आणि नंतर पूर्ण दुनियेत मी टू अभियाना मोठ्या प्रमाणावर सुरू झालं होतं.
 
हार्वेची वाईट नजर भारतीय नायिका आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिच्यावर देखील होती. एका वेबसाइटवर पोस्ट करण्यात आलेल्या स्टोरीत सिमोन शेफील्ड नावाच्या महिलेने दावा केला की हार्वेने ऐश्वर्या राय हिच्यासोबत एकट्यात भेटण्याचा हठ्ठ धरला होता. सिमोन, ऐश्वर्या रायचे काम सांभाळायची. सिमोन यांच्याप्रमाणे हार्वेने अनेकदा विचारले होते की ऐश्वर्याशी एकट्यात भेटण्यासाठी काय करावे लागेल. सिमोनला समजले की हार्वे यांची ऐश्वर्यावर वाईट नजर आहे, पण त्यांनी हार्वेला ही संधी मिळू दिली नाही.