शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

हॉलिवूड भक्षक हार्वे वेन्स्टाइनला अटक, या नायिकांचा केला लैंगिक छळ

हॉलिवूड नायिकांच्या लैंगिक छळ प्रकरणात आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क पोलिसाने अटक केली. त्यावर हॉलिवूडच्या अनेक नायिकांसह सुमारे 50 महिलांवर बलात्कार आणि दुर्व्यवहार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर हॉलिवूड आणि नंतर पूर्ण दुनियेत मी टू अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू झाले होते.
 
हॉलिवूडचा हा निर्माता सकाळी 7:30 वाजता आपल्या काळ्या रंगाच्या एसयूव्ही गाडीत बसून पोलिस स्टेशन पोहचला होता. अटक केल्यावर त्याला मॅनहॅटन आपराधिक न्यायालयात प्रस्तुत केले गेले. त्यावर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.
 
माहितीप्रमाणे पोलिस आणि डिस्ट्रिक्ट अटॉर्नी यांनी चौकशी नंतर वेन्स्टाइनवर दोन महिलांवर बलात्कार आणि लैंगिक छळाचे आरोप निश्चित केले आहे. त्यातून एक प्रकरण 2004 आणि दुसरे 2013 चे आहे. वेन्स्टाइन दोन्ही महिलांची माफी मागून चुकले आहे तरी संमतीशिवाय सेक्स केल्याचा आरोप त्यांनी नाकारला आहे.
 
कोर्टाने वेन्स्टाइनला 1 मिलियन डॉलर च्या बॉन्डवर मुक्त केले आहे. ते न्यूयॉर्क आणि कनेक्टिक हून बाहेर जाऊ शकणार नाही आणि या दरम्यान त्यांना त्यांच्या पायात एक एंकल मॉनिटर घालावे लागेल.
 
उल्लेखनीय आहे की मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकी न्यूजपेपर न्यूयॉर्क टाइम्स आणि न्यू यॉर्कर ने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला होता की सुमारे 12 महिलांनी वेन्स्टाइनवर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे.
 
या नायिका झाल्या होत्या वेन्स्टाइनचा शिकार: यानंतर ग्वेनेथ पॅल्ट्रो, एलिसा मिलानो, रोज मॅक्गोवन, अॅश्ले जुड, सलमा हाएक सह अनेक हॉलिवूड नायिकांनी वेन्स्टाइनवर आरोप लावले. या रिर्पोटनंतर एक-एक करुन सुमारे 50 महिलांनी स्वीकारले की वेन्स्टाइनने त्यांना काम देण्याच्या बहाण्याने चुकीने स्पर्श करत छेड काढली.
 
मी टू हॅशटॅग वापरणार्‍या सिलेब्रिटीजमध्ये एलिसा मिलानो ही पहिली हाय-प्रोफाइल महिला होती. एलिसाने वेन्स्टाइनवर लैंगिक छळाचा आरोप लावला होता.
 
काय म्हणाली होती अॅश्ले जुड: प्रसिद्ध हॉलिवूड नायिका अॅश्ले जुड हिने सांगितले की 20 वर्षांपूर्वी हार्वे यांनी काम देण्यासाठी मला आपल्या बंगल्यावर बोलावले. मी तिथे पोहचले तेव्हा त्यांनी केवळ टॉवेल गुंडाळलेला होता आणि ते मला मसाज करण्याचा आग्रह करू लागले.  नंतर अनेकदा मला हॉटेलच्या खोलीत बोलावून आक्षेपार्ह कार्य करण्यास भाग पाडायचे.
 
कसा होता एंजेलिना जॉली हिचा अनुभव : करिअरच्या सुरुवातीला हार्वेसोबत काम करणारी प्रसिद्ध नायिका एंजेलिना जॉली हिने सांगितले की त्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच वाईट होता. म्हणून नंतर तिने कधीच त्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आणि इतरांना हाच सल्ला दिला.