कुमारस्वामींचे लग्न झाले तेव्हा दुसरी पत्नी आली होती जन्माला
कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा लोकांना त्यांच्या दुसऱ्या पत्नी अभिनेत्री राधिका हिच्याबद्दल जाणून घेण्यात अधिक रस आहे. इंटरनेटवर तिला खूप सर्च केलं जातं आहे.
राधिक साऊथची अभिनेत्री आणि निर्माती आहे. ती कुमारस्वामी यांची दुसरी पत्नी असून त्यांच्याहून वयाने 28 वर्ष लहान आहे. दोघांची एक मुलगी असून शमिका कुमारस्वामी असे तिचे नाव आहे. जेव्हा कुमारस्वामी यांचे पहिले लग्न झाले होते तेव्हा राधिकचा जन्म झाला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्राने कुमारस्वामी व राधिका आता एकत्र नाहीत. कुमारस्वामी यांनी २००६ साली राधिकाबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांनी त्याबद्दल कधीही जाहीर चर्चा केली नाही. कुमारस्वामी यांचे पहिले लग्न १९८६ साली अनिता यांच्यासोबत झाले. त्यांचे पहिल्या पत्नीच्या
घरी जाणे येणे सुरू असल्यामुळे राधिकाबरोबरचे नाते संपुष्टात आले. पण त्याबद्दल कधीही कोणीही वाच्यता केली नाही. अनितापासून त्यांना निखिल नावाचा मुलगा आहे.
२००७ साली मुख्यमंत्री असताना कुमारस्वामी राधिकाबरोबर सुट्टी घालवण्यासाठी परदेशात गेले होते आणि त्याआधीही हिल स्टेशनवर त्यांना अनेकांनी एकत्र बघितले होते. राधिकाचे पहिले लग्न 2000 मध्ये रतन कुमार याच्याबरोबर झाले होते. पण २००२ मध्ये त्याचे निधन झाले होते.