मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बंगळुरू , सोमवार, 21 मे 2018 (11:19 IST)

27 वर्षांनी लहान आहे कुारस्वामींची पत्नी

भाजपच्या येडीयुरप्पांनी राजीनामा दिल्याने धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. कुारस्वामी हे बुधवारी कर्नाटकच्या मुख्यंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकीकडे त्यांच्या मुख्यंत्रिपदाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांची पत्नी राधिका कुारस्वामी ही चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या ती ट्रेंडमध्ये आहे.
 
कुारस्वामींची बायको खरे तर तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. राधिका कन्नड चित्रपटात अभिनेत्री, दिग्दर्शक म्हणून काम करते.
 
कुारस्वामी 58 वर्षांचे असून राधिकाचे वय 31 वर्षे आहे. 2005 पासून ते एकमेकांच्या संपर्कात होते, त्यामुळे राधिकाचे करियरकडे थोडे दुर्लक्ष झाले होते. 2006 मध्ये जेडीएस नेते कुारस्वामी यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. या दोघांना एक मुलगी असून शमिका असे तिचे नाव आहे. राधिकाची स्वतःची 140 कोटी रुपयांची संपत्ती आहे. राधिकाने आतापर्यंत जवळपास 32 चित्रपटांमध्ये काम केले आहे. कन्नड चित्रपटांशिवायही तिने काही तामिळ चित्रपटांतही काम केले आहे. तसेच सध्या ती दिग्दर्शकाचेही काम करते.
 
राधिकाने पहिल्यांदा 'नीला मेघा शमा' या चित्रपटात काम केले त्यावेळी ती नववीत शिकत होती. तिचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट 'नीनागागी' हा होता. तेव्हा विजय राघवेंद्रबरोबर तिने काम केले होते.
 
दोघांचाही दुसरा विवाह
कुारस्वामी आणि राधिका या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी कुारस्वामी यांनी 1986 साली अनिता नावाच्या महिलेशी लग्न केले होते. त्या पत्नीचाही एक मुलगा असून निखिल गौडा असे त्याचे नाव आहे. राधिकाचे हे दुसरे लग्न असून याअगोदर तिने 2000 मध्ये रतन कुमार नावाच्या व्यक्तीशी तिने लग्न केले होते.