सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चेन्नई , सोमवार, 21 मे 2018 (10:55 IST)

भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची थट्टा : रजनीकांत

कर्नाटकातील येडीयुरप्पा सरकारने बहुत सिद्धकरण्यासाठी काही अवधी मागीतला असता राज्यपालांनी थेट 15 दिवसांचा अवधी देणे, ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच होती, असे रजनीकांत म्हणाले.
 
आपला राजकीय पक्ष तळिनाडूतील आगामी निवडणुका लढवेल, असे सुप्रसिद्ध स्टार रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. मात्र, 2019च्या निवडणुका लढवायच्या की नाही हे आम्ही निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ठरवू असे त्यांनी आता स्पष्ट केले. आतापर्यंत पक्षाची स्थापना झालेली नसली तरीही आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहोत, असेही ते म्हणाले. कोणत्याही पक्षाशी युती करण्याबाबत आता वक्तव्य करणे घाईचे ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.