बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (15:21 IST)

म्हणून खासदार प्रितम मुंडे प्रचारापासून अलिप्त

बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजप-राष्ट्रवादी या पारंपारिक पक्षात तुल्यबळ लढत होत असताना बीडच्या खासदार प्रितम मुंडे मात्र प्रचारापासून अलिप्त आहेत.  कारण काही वर्षांपूर्वी मुबईत त्यांचा झालेल्या अपघातात मानेच्या मणक्याला मार लागला होता तेव्हा पासून त्या या आजाराने त्रस्त आहेत, जरा थोडीशी धावपळ किंवा दगदग झाली की प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागतो, सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या मानेला बेल्ट घालून आल्या होत्या. मुंबईत सध्या त्या उपचार घेत आहेत, एका जागेवरूनच त्या या निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवत आहेत. भ्रमणध्वनीवरून थेट मतदारांशी संपर्क साधत आहेत. आणि सुरेश धस यांच्या विजयाची त्यांना खात्री आहे.