गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 21 मे 2018 (10:43 IST)

पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उंचीवर

मुंबईत पेट्रोलचा सर्वाधिक भाव
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राजधानी दिल्लीत नव्या उंचीवर पोहोचल्या. दिल्लीत तो 33 पैशांनी वाढून 76.24 रुपयांवर पोहोचला. तर डिझेल 26 पैशांनी वाढून 67.57 रुपये प्रति लीटरवर पोहचले. स्थानिक विक्री कर आणि व्हॅट अनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. देशातील अन्य राज्यांच्या राजधानीत आणि मेट्रो शहरात पेट्रोल हे दिल्लीपेक्षा महाग आहे.
 
मागील 4 आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलिय पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. या आठवड्यात पेट्रोलच्या दरात देशात 1.61 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 1.64 रुपये प्रतिलीटर महागले.