1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (08:47 IST)

सोन्याच्या दरात घट, चांदीही स्वस्त

gold silver rates down

सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या किंमतीत २४० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३१,७८० रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर चांदीही स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४०,७५० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.