शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (08:46 IST)

बादलीत पडून चिमुरडीचा मृत्यू

girl

वसमत तालुक्यातील कोठारीत दोन वर्षीय चिमुकचा बादलीत पडून मृत्यू झाला आहे. धनश्री विश्वनाथ नरवाडे असे मृत्‍यू झालेल्‍या मुलीचे नाव आहे. गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास  विश्वनाथ नरवाडे यांची मुलगी धनश्री ही घरात खेळत होती. खेळत असतानाच ती घरामध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत पडली. हा प्रकार घरातील लोकांच्या लक्षात येताच तिला पाण्यातून बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी वसमत येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्‍याठिकाणी डॉक्‍टरांनी धनश्रीचा मृत्‍यू झाल्याचे घोषीत केले.