मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मे 2018 (08:30 IST)

इ सिगारेटचा स्फोट, टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू

फ्लोरिडात टलमाडगे वेकमन डी एलिया (३८) या  टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी एलिया असे टीव्ही प्रोड्युसरचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या इ सिगारेटचा स्फोट झाला. त्यात तो ८० टक्के भाजला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.टलमाडगे वेकमन डी एलियाच्या मृतदेहाची ऑटप्सी करण्यात आली. त्यानंतर ही बाब निश्चित झाली की इ सिगारेटच्या स्फोटात भाजल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.  इ सिगारेटच्या स्फोटामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याच्या बेडरुममध्ये या सिगारेटचा स्फोट झाला. टलमाडगे वेकमन डी एलियाने CNBC साठी प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. या सिगारेटचा अचानक स्फोट झाला आणि त्यात तो भाजला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.