1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By

अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर ची एका आठवड्यात १५० कोटींची कमाई

avengers infinity war
हॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने एका आठवड्यात १५० कोटींची कमाई केलीये.  बुधवारी या सिनेमाने ११ कोटी ७५ लाख रुपयांचे कलेक्शन केलेय. मात्र पाच दिवसांमध्ये दर दिवसाला २० कोटीहून अधिक कमाई करण्याच्या वेगाला ब्रेक लागला. अँथनी आणि जो रुसो यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला.  आतापर्यंत जगभरात तब्बल ९०० मिलियन डॉलरहून अधिक कमाई करणारा अॅव्हेंजर्स शुक्रवारच्या कलेक्शनसह एक बिलियनचा आकडा गाठू शकतो. 

अशी होती अॅव्हेंजर्सची कमाई

पहिला दिवस - शुक्रवार ३१.३० कोटी रुपये
दुसरा दिवस - शनिवार - ३०.५० कोटी रुपये
तिसरा दिवस - रविवार - ३२.५० कोटी रुपये
चौथा दिवस - सोमवार - २०.५२ कोटी रुपये
पाचवा दिवस - मंगळवार - २०.३४ कोटी रुपये
सहावा दिवस - बुधवार - ११.७५ कोटी रुपये
सातवा दिवस - गुरुवार - ९.७३ कोटी रुपये