शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मे 2018 (09:00 IST)

अमेरिकेच तिकीट फक्त 13 हजार

आईसलँडच्या ‘वॉव एअर’ या विमान कंपनीने भारतात प्रवेश केला आहे. त्यामुळे  अमेरिकेला फक्‍त 13 हजार 500 रुपयांत नेण्याची योजना सादर केली आहे. या योजनेचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. वॉव एअरलाईन्सने केवळ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आखलेली नाही तर आमची तिकिटे इतर कंपन्यांच्या तुलनेत नेहमीच स्वस्त असतील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कूली मोगेन्सन यांनी सांगितले.
 

काही विमान कंपन्या जून महिन्यात भारतातून अमेरिकेत जाण्यासाठी स्वस्त तिकिटाची ऑफर देतात. मात्र या बहुतेक कंपन्यांची तिकिटे 30 हजारांपेक्षा जास्त किमतीची आहेत.