शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (16:59 IST)

भाजप सत्तेचा दुरूपयोग करत आहे : राज ठाकरे

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसनं बहुमताचा आकडा गाठलेला असताना भाजप सत्तेचा दुरूपयोग करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपचे असल्यामुळे ते भाजपलाच मदत करणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्या भाजपचीही सत्ता जाणार आहे हे त्यांनी विसरु नये. अशा वेळी नव्यानं येणाऱ्या सरकारमार्फत भाजपची देखील इडी मार्फत चौकशी होऊ शकते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
'कर्नाटकाचे राज्यपाल मुळात गुजरातचे आहेत. मला जी माहिती मिळाली, त्याप्रमाणे २००१ मध्ये त्यांनी मोदींसाठी राजकोटची जागासोडली होती, त्यांच्यामुळे ते नरेंद्र मोदी यांच्या गुडबू्क्समधील राज्यपाल आहेत. ते भाजपच्या फेवरमध्येच काम करणार आहेत, दुसरीकडे जेडीएस आणि काँग्रेसकडे बहुमत आहे, त्यांचं सरकार बनतंय, मग त्यांना का नाही सरकार बनवण्यासाठी आमंत्रण नाही दिलं. मग तोच न्याय मणीपूर आणि गोव्यामध्ये किंवा मेघालयमध्ये का नाही लावला, हे असं चाललंय, 'जिस की लाठी उस की भैस', हे काही बरोबर नाही चाललंय असं सांगितल.