शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: वाराणसी , बुधवार, 16 मे 2018 (11:55 IST)

वाराणसीत फ्लायओवर घटना; या मृत्यूंचे जबाबदार कोण

येथे बांधका सुरू असलेला एक पूल कोसळून झालेल्या अपघाताध्ये सुमारे 20 जण ठार झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने तसा दावा केला आहे. पूल कोसळल्यामुळे ढिगार्‍याखाली सुारे 50 जण दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम  सुरू होते.
 
छावणी रेल्वे स्थानकाच्या जवळ या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. मृतांत आणि ढिगार्‍याखाली अडकेल्या लोकांमध्ये बहुतांश मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जेसीबीच्या सहायाने ढिगारा उपसण्याचे आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक अधिकारी, पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रात्री उशीरार्पंत मदतकार्य चालू होते.