गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 एप्रिल 2018 (15:56 IST)

उंदरांचा पराक्रम, केली तीन मजली इमारत जमीनदोस्त

आग्रा येथील महाकामेश्वर मंदिर परिसरात  उंदरांमुळे तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे.  इमारतीच्या खाली अनेक वर्षापासून उंदरांनी बीळ तयार करून इमारतीचा पायाच पोखरून काढल्याने ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
 
सदरच्या परिसरात उंदरांची संख्या वाढल्याने या समस्येला कित्येक वर्षापासून सामोर जावं लागत असल्याच इमारतीतील रहिवाशांनी सांगितलं. उंदीर इमारतीच्या खाली बीळ तयार करतात. तसेच सीवेज लाईन, पाईप लाईन आणि अन्य इतर गोष्टीचे नुकसान करतात. या सर्व कारणांमुळेच इमारत खालून उंदराच्या पोखरण्याने पोकळ झाली होती. शनिवारी आग्रामध्ये जोरदार पाऊस पडला. पावसाचं पाणी हे इमारतीच्या खाली असलेल्या बीळात शिरलं. यामुळेच आपल्या घराला धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना घराचे मालक सुधीर कुमार वर्मा यांना आली होती. त्यामुळेच त्यांनी कुटुंबीयांसह घर खाली केले होते आणि त्यानंतरच काही तासांनी इमारत कोसळली. इमारत कोसळल्याची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर हा  व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.