सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 16 एप्रिल 2018 (15:35 IST)

डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता येणार

आता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून चुकून डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स परत मिळवता येणार आहे. व्हॉट्स अॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ आपण डाऊनलोड केले की ते गॅलरी किंवा मोबाईलच्या फोल्डरमध्ये जमा होतात. हे फोटो आपण एकदा का आपल्या मोबाईलमधून डिलीट केले की ते पुन्हा डाऊनलोड करता येत नाही. पण आता व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये बदल केले असून हे फोटो डाऊनलोड करून जरी युजर्सनं डिलीट केले असतील तरी त्याला चॅटवर जाऊन ते परत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र युजर्सनं इनबॉक्समधल्या मूळ चॅट्स डिलीट केल्या तर मात्र त्याला हे फोटो परत मिळवता येणार नाही.
 
सोबतच  ‘sdcard/WhatsApp/’ या फोल्डरमध्येही हे फोटो आहेत की नाही हे देखील नवीन अपडेट्सनुसार युजर्सना तपासता येणार आहे. व्हॉट्स अॅप संदर्भात माहिती देणाऱ्या WABetaInfo नं ही माहिती दिली आहे. अर्थात अँड्राइड युजर्ससाठी हे फीचर्स असणार आहे.