शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

उन्हाळ्यात हीट स्ट्रोक्सपासून बचावासाठी

उन्हाळ्यात मिळणार्‍या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असतं, म्हणून अश्या फळांचे सेवन अवश्य करावे. जसे टरबूज, खरबूज, काकडी इतर नियमित सेवन केल्याने पाण्यासोबतच खनिज-लवण पूर्ती होण्यात मदत मिळते.
 
उन्हाळ्यात सामान्य आहार जसे वरण, भात, भाजी, पोळी खाणे योग्य ठरतं. उन्हाळ्यात भुकेपेक्षा कमी आहार घेतला पाहिजे. याने हजमा देखील चांगला राहील आणि शरीरात स्फूर्ती राहील. यासोबत तेलकट पदार्थ खाऊ नये.
 
उन्हाळ्यात सर्वाधिक पाणी घामामुळे बाष्पीभवित होतं म्हणून दिवसातून किमान चार लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी, ताक आणि लस्सी पिण्याने पाण्याचे संतुलन राहण्यात मदत मिळते.
 
उन्हाळ्यात मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जेवण्यात अती प्रमाणात मीठ सेवन करणे टाळावे. नमकीन, शेंगदाणे, तळलेले पापड-चिप्स, अती प्रमाणात तेलाचे लोणचे खाणे टाळावे.