शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

हायपर अॅक्टिव्ह नियंत्रण?

high par active
हायपर अॅक्टिव्ह, म्हणजेच अत्यधिक प्रमाणामध्ये सक्रिय असणारी मुले घरामध्ये असणे, ही घरातील सर्वच मोठ्या माणसांच्या धावपळीचा आणि सहनशक्तीचा कस लागेल अशी बाब आहे. ही मुले अतिशय चंचल म्हणता येतील. ह्याचे न एका गोष्टीवर फार काळ स्थिर राहू शकत नाही. तसेच ही मुले एका ठिकाणी फार वेळ बसू शकत नाहीत. त्यांना सतत काहीतरी नवीन लागते. अशी मुले नेही काहीतरी उचापती करून घरच्या मंडळींच्या नाकीनऊ आणत असतात. या मुलांना एकटे, देखरेखीच्या विना सोडूनही चालत नाही. कुठल्या क्षणी ह्यांच्या मनामध्ये कोणती कल्पना येईल याचा नेमका अंदाज घेणे कठीण असते.
 
अशा अति सक्रिय मुलांचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील ऊर्जेला व्यवस्थित चालना देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. अशा मुलांना खेळांमध्ये किंवा कामांमध्ये गुंतवावे, ज्यामध्ये त्यांची शारीरिक ऊर्जा खर्च होईल. तसेच ह्या मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना बोर्ड गेम्स, कोडी सोडविणे अशा प्रकारचे बौद्धिक व्यायाम आवश्यक आहेत. अति सक्रिय मुलांचे मन शांत करण्यासाठी धुर, संथ संगीतचा उपयोग करण्याचा सल्ला मनोवैज्ञानिक देतात. तसेच टीव्ही, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम्स, मोबाइल ह्यांचा वापर मर्यादित ठेवायला हवा. ह्या साधनांच्या अतिवापराने मुलांचे मन आणखी सक्रिय होत असते. तसेच ह्या साधनांधील मोठे, कर्कश आवाज, भडक रंग यांचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचे मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.