1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

घाटकोपर इमारत दुर्घटना मृतांची संख्या १३ वर

Mumbai Building Collapse
मुंबई येथील  इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १३ वर गेली आहे. यामध्ये अजुनही मदत कार्य सुरु आहे. पडलेल्या इमारतीच्या तळमजल्याला नर्सिंग होम... नर्सिंग होमच्या बांधकामामुळे बिल्डिंग कोसळली, रहिवाशांचा आरोप केला जात आहे. या ठिकाणाहून होत असलेली ईस्टर्न एक्सप्रेसवेवर घाटकोपरकडे जाणारी वाहतूक बंद केली गेली आहे. तर हे बचाव कार्य सुरु होते तेव्हा बचावकार्य करताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी  झाला आहे.
 
शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी जबादार ?
 यामध्ये एक नवीन महिती पुढे आली आहे. की या भीषण  दुर्घटनेला फक्त आणि फक्त  इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार  आहे. यामध्ये शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील सितप याचं हे रुग्णालय आहे अशी महिती समोर आली आहे. त्याने दोन वर्षपूर्वी येथे मोठे बांधकामातील बदल केले होते. आणि हे रुग्णालय  महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होते. जेव्हा इमारतीती बदल केले तेव्हा नागरिकांनी विरोध केला मात्र हा विरोध न जुमानता हे सर्व अंतर्गत बदल केले आणि अनेक कॉलम तोडले होते. त्यामुळे  ही इमारत कोसळली आहे असे प्राथमिक रित्या  समोर आले आहे.