मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 मे 2018 (08:58 IST)

विजापूरमध्ये मजुराच्या घरी सापडल्या व्हीव्हीपीएटी मशीन

धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील शेद येथे  निवडणूक आयोगाने ८ व्हीव्हीपीएटी मशीन जप्त केल्या आहेत.  मजुराच्या घरातून या मशीन जप्त करण्यात आल्या आहे.  व्हीपीएटी मशीनच्या बॉक्सचा वापर हा मजूर आपली कपडे ठेवण्यासाठी करत होता.  कर्नाटक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘व्हीव्हीपीएटी मशीनचे ८ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळी मशीन मिळाली नाही. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.’  एका बाजूला कर्नाटक निवडनुकीवरून पूर्ण देशात कलह सुरु आहे. तर अनेक किस्से बाहेर येत आहेत. भाजपा व्होट मिळते अकारण मशीन र  वापरतात असे आरोप होतात त्यात अश्या अवस्थेत   मशीन  सापडले आणि चर्चेला उधान   आले . निवडूक आयोग सतर्क झाले असून या   प्रकरणाची जोरदार तपासणी करत आहेत.