1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Mild earthquake tremors again felt in Surgana taluka

नाशिक जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, निवरापाडा आणि राशा परिसरात आज पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या ३-४ दिवसांपासून ही मालिका सुरू असल्याने नागरिक दहशतीत आहे. प्रशासनाकडे तातडीने भूकंपमापन यंत्र बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात आज पुन्हा जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी साधारण ८:३० च्या सुमारास हे धक्के जाणवले. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा, गोंडाळविहीर आणि अलंगुण या गावांमध्ये धक्के सर्वाधिक तीव्र होते.  

सलग ४ दिवसांपासून भूकंपाची मालिका
हे धक्के अचानक आलेले नसून, गेल्या चार दिवसांपासून या भागात भूगर्भीय हालचाली सुरू आहे. वारंवार होणाऱ्या धक्क्यांमुळे अनेक ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा शेतात झोपणे पसंत केले आहे.
तहसीलदार आणि महसूल विभागाने घटनास्थळी भेट दिली आहे. नागरिकांना कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या घरांमध्ये न राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उंबरठाण हे या धक्क्यांचे केंद्र असल्याचे दिसत असल्याने, तिथे तातडीने 'भूकंपमापन यंत्र' बसवण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के