शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दिलीप कुमार लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना छातीच्या संसर्गामुळे तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सूत्रांप्रमाणे दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. इकडे स्वत: दिलीप कुमारा यांनी ट्विटर हॅण्डलवर त्यांची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले आहे.
 
येथील डॉक्टरांप्रमाणे दिलीप कुमार हे रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते म्हणून काळजीसारखे काही नाही. 
 
दरम्यान, दिलीप कुमार यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. डिहाइड्रेशनमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती.