शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (16:37 IST)

परत बघायला मिळाला सुहाना खानचा सिजलिंग अवतार, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसला असा लुक

श्वेता बच्चनच्या स्टोर लॉन्चच्या प्रसंगी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सर्वाचे आकर्षणाचे केंद्र  बनली होती. लोक तिचा हा लुक विसरलेही नव्हते आणि सुहाना ने परत सर्वांचे होश उडवले. हो ती मुंबईत व्हाईट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. सुट्या केसांमध्ये सुहाना फारच सुंदर दिसत होती.  
 
या दरम्यान सुहानाची खास दोस्त आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे देखील सोबत होती. तिनी  व्हाईट कलरचे कपडे परिधान केले होते. अनन्या लवकरच चित्रपट स्टूडेंट ऑफ द इयर-2मध्ये दिसणार आहे. तिच्या अपोजिट टायगर श्रॉफ आहे.  
 
काही दिवसांअगोदर सुहाना खानने वोग मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट करवला होता. ज्यामुळे ती फार चर्चेत आली होती. काही लोकांनी सुहानाला ट्रोल देखील केले होते. कारण त्यांच्या मतानुसार सुहानाला हा मोठा ब्रेक फक्त शाहरुख खानची मुलगी असल्यामुळे मिळाला आहे आणि तिने अद्याप बॉलीवूडमध्ये एकाही चित्रपटात काम केलेले नाही आहे.  
 
अनन्या पांडे शाहरुख खानच्या मुलीची खास दोस्त असून ती श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ़ अली खानची मुलगी सारा प्रमाणे आपल्या चित्रपटाबद्दल सतत चर्चेत असते.  
अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन नंदाने आपली मुलगी नव्या नवेली नंदा आणि फॅशन डिझायनर दोस्त मोनिशा जयसिंहसोबत मिळून मुंबईत एक फॅशन स्टोअर लॉन्च केला आहे. या प्रसंगी पूर्ण बॉलीवूड श्वेताला सपोर्ट करायला पोहोचला. पण येथे सुहानाने आपल्या लुकमुळे सर्व लाईम लाइट घेऊन घेतली.