रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लग्नाच्या लिफाफ्यात एवढे पैसे ठेवतात बॉलीवूड सेलिब्रिटीज

बॉलीवूडमध्ये लग्न सोहळे सुरूच आहे. दीपिका-रणवीर यांच्यानंतर प्रियंका चोप्रा हिचे लग्न झाले आणि आता कॉमेडी किंग देखील 12 डिसेंबर रोजी आपल्या गर्लफ्रेंड गिन्नी हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे.
 
अलीकडेच कपिल शर्मा कौन बनेगा करोड़पति च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहचला होता आणि होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी बातचीत दरम्यान मनोरंजक‍ रहस्य उघडकीस आलं. अमिताभ यांनी कपिलला सांगितले की बॉलीवूडमध्ये शगुनाच्या लिफाफ्याची एक परंपरा आहे.
 
अभिताभ यांनी सांगितले की बॉलीवूड सेलिब्रिटीच्या लग्नात सामील होणार्‍यांना लिफाफ्यात किती रक्कम ठेवावी हा प्रश्न असतो. अशात ज्युनिअर कलाकार आणि इतर स्टॉफला आपल्या सीनियर कलाकारांच्या विवाह सोहळ्यात सामील होण्यात संकोच व्हायचा.
 
अशात शगुनाच्या लिफाफ्यात 101 रुपये रक्कम ठेवण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली. अशात सर्व लोकं एवढीच रक्कम शगुन म्हणून लिफाफ्यात ठेवतात. याने समानता देखील आली आणि कोणालाही संकोच वाटू नये याची काळजी घेतली गेली.