रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरू होणार

कपिल छोट्या पडद्यावरही पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरू होणार आहे. याबाबतची माहिती कपिलनं एका वेबसाईटशी बोलताना दिली आहे. सध्या या संदर्भातली बोलणी प्राथमिक टप्प्यावर सुरू आहे असंही कपिल म्हणला. पण तत्पुर्वी कपिल निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाची निर्मिती कपिलनं केली आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
कपिलनं गेल्या काही काळात अनेक चढउतार पाहिले. काही महिन्यांपूर्वी कपिलनं आपल्या चाहत्यांशी ट्विटरवर संवाद साधला होता, त्यात अनेकांनी कपिलला त्याचा शो पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती