रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (11:44 IST)

हॉलिवूड हे माझ्यासाठी आकाशातील चंद्राप्रमाणे

बॉलिवूडमधील बहुतेक कलाकारांनी हॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावून पाहिले आहे. त्यात काहीजण यशस्वी तर काहीजण अयशस्वी झाले आहेत. पण हॉलिवूडची कवाडे अद्यापपर्यंत बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणजेच शाहरुखसाठी उघडलेली नाही. शाहरुखच्या मागून इंडस्ट्रीत आलेल्या ऐश्र्वर्या, दीपिका, प्रियांकाने हॉलिवूड चित्रपटातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण हॉलिवूडची पायरी शाहरुखला काही चढता आली नाही. याबाबत शाहरुख म्हणतो, 'माझ्यासाठी हॉलिवूड हे आकाशातील चंद्राप्रमाणे आहे आणि मी ज्याच्याकडे रोज पाहतो, पण मी त्या चंद्राकडे काही केल्या पोहोचू शकत नाही.' हॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल नुकतेच शाहरुखला विचारण्यात आले. शाहरुखने त्यावेळी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. आता माझ्याकडे हॉलिवूडने पाहायला हवे. हॉलिवूडमध्ये ओमपुरींपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत सगळ्यांनी काम केले आहे. पण हॉलिवूडमध्ये काम करण्याची मला काही संधी मिळालीच नाही. कदाचित मी हॉलिवूडसाठी योग्य नसेल अशी प्रतिक्रिया शाहरुखने एका मुलाखतीत दिली आहे. तसेच माझे इंग्रजी हॉलिवूडमध्ये काम करण्याएवढे चांगलेही नसेल अशी मजेशीर प्रतिक्रियाही त्याने दिली आहे.