1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

शाहरुखची सिग्रेचर पोझ वाहतूक नियंत्रणात उपयोगी

shahrukh khan helps irfan
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याची अनेक चित्रपटात दिसलेली आणि त्यामुळे सिग्रेचर बनलेली एक पोझ आसाम राज्यात वाहतूक नियंत्रण कामी उपयोगात आणली गेली असून या कल्पनेचे खुद्द शाहरुखने कौतुक केले आहे. दोन्ही बाहू परलेल्या अवस्थेतली ही पोझ शाहरुखच्या अनेक गाजलेल्या चित्रपटात लोकांनी पाहिली असेल. आसामचे वाहतूक विभागाचे अधिकारी पोन्जीत डोवराह यांनी शाहरुखच्या या पोझचा आधार घेऊन ट्विटरवर एक संदेश जारी केला आहे. या संदेशात ते म्हणतात, शाहरुखच्या या पोझने आपल्यासारख्या अनेकांच्या हृदयात जागा मिळविली आहे. वाहतूक नियमांचे पालन करा. ते सर्वांसाठी सुखाचे असणार आहे. शाहरुखने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे कौतुक केले असून माझी सिग्रेचर पोझ या कामी उपयोगी आली असे म्हटले आहे. शाहरुख सध्या झिरो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त  असून यात तो बुटक्या माणसाची भूमिका साकारत आहे.