शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'झिरो' चा ट्रेलर होणार 'या' खास दिवशी रिलीज

शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'झिरो'या चित्रपटाचा ट्रेलर निर्माता-दिग्‍दर्शक शाहरुख खान आपल्‍या वाढदिवसानिमित्त रिलीज करणार आहे. ही माहिती खुद्‍द चित्रपटाचे दिग्‍दर्शक आनंद एल. राय यांनीदिली आहे. आनंद राय म्‍हणाले, ‘आम्‍ही २ नोव्‍हेंबर, खानच्‍या जन्मदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.' 

शाहरुख खानच्‍या या चित्रपटाचा टीझर १५ जूनला ईदच्‍या औचित्‍याने रिलीज करण्‍यात आला होता. त्‍यानंतर कॅटरीना कैफच्‍या चित्रपटातील नवा लुक तिच्‍या वाढदिवसादिवशी १७ जुलैला रिव्‍हिल करण्‍यात आलं होतं. झिरोमध्‍ये शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफ दिसणार आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.